पत्रकार निखिल वागळे विरुद्ध पुण्यात भाजपने केला गुन्हा दाखल...



   भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त Twit केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पुण्यातील भाजपचे नेते सुनिल देवधर (वय ५८, रा.नारायण पेठ) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २६/२४) दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न दिल्याबद्दल सोशल मीडियावर संदेश देऊन अभिनंदन केले होते. त्यावर एक्स वर Twit करताना पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे अडवाणी यांना मानणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला,तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जन मानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली,असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या