बलात्कारी,भोंदू गुरुदास बाबा अमरावती पोलिसांना सापडला...




     अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मार्डी लगत असलेल्या कारला या गावात आपल्या आश्रम नामक दुकानात गेल्या काही वर्षांपासून साध्याभोळ्या जनतेला मूर्ख बनविणाऱ्या मार्डी येथील गुरुदासबाबाच्या "गुरुलीला" पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यावर  आणि स्थानिक कुऱ्हा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यावर फरार झालेला गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव कावलकर काल रात्री अमरावती पोलिसांच्या जाळ्यात भोपाळ येथील एका लॉज मध्ये सापडला असून त्याला आज सकाळी अमरावतीला आणण्यात आले आहे.


   मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेचे सतत काही महिने शारीरिक शोषण याच सुनील कावलकर उर्फ गुरुदासबाबाने केल्याची खळबळजनक घटना यातील पीडित महिलेने कुऱ्हा पोलीसांत तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली होती.त्यानंतर अमरावती येथील अनेक सामाजिक व महिला संघटना यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून  कठोर कारवाई व्हावी यासाठी निवेदने देण्यात आली होती.


   या भोंदूगिरी करणाऱ्या गुरुदास बाबा विरुद्ध २५ जानेवारीला कुऱ्हा पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावर कुऱ्हा ठाणेदार गीता तांगडे यांनी गुरुदासबाबा उर्फ सुनील जानराव कावलकर (४७) यावर शारीरिक अत्याचार, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हा नकली गुरुदासबाबा हा फरार झाला असता अमरावती पोलीसांनी काल त्याचा ठावठिकाणा शोधून भोपाळ येथील एका लॉजमधून त्याला अटक करून अमरावतीला आणले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या