दहीहंडा पोलिसांना लावुन गुटख्याची लत, दिनू बजाज मात्र तस्करीत व्यस्त...



   अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील पूर्णा नदीच्या सुपीक खोऱ्यात सर्वाधिक ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या दहीहंडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना "प्राणघातक" गुटख्याची लत लागली असून त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मात्र चांगलेच धोक्यात आले आहे.


   सर्वाधिक म्हणजे थोडेथोडके नव्हे तर तब्बल ९० गावांचा व्याप असलेल्या दहीहंडा पोलीस स्टेशनचा कारभार चोहोट्टा बाजार व कुटासा या दोन पोलीस चौक्यांच्या भरवशावर पाहिला जात आहे.या ठाण्यात कर्मचारीवर्ग हा पुरेसा नसला तरी आवश्यक आहे तितका दिल्या गेलेला आहेच.याच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने येथील ठाणेदार आपला कारभार चालवीत आहेत.

    मात्र याच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्यात विक्री व खाण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या या "गुटख्याची लत" लागली असून हा प्राणघातक गुटखा आजरोजी दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात अगदी बिनबोभाटपणे खुल्लेआम मिळत असल्याने लहान मोठे सर्वच या गुटख्याच्या आहारी गेले आहेत.


    दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अगदी राजरोसपणे "गुटखा व्यापारी' आणि "गुटखा तस्कर"  यांचे पंटर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छाताडावर नाचत ग्रामीण भागातील दुकानदारांना गुटख्याची "घरपोच डिलिव्हरी" करीत असून पोलीस कर्मचारी मात्र उघड्या डोळ्यांनी पाहून देखील "डोळेझाक" करीत आहेत.

    अकोला शहरातील सिंधी कॅम्प एरियातील रहिवाशी असलेला दिनू बजाज नामक गुटखा दलाल दररोज सकाळी ७ वाजल्यापासून तर दुपारी २ वाजेपर्यंत चोहोट्टा बाजार,करोडी व रेल येथील आपल्या पंटर लोकांना हाताशी धरून चोहोट्टा बाजार परिसरातील प्रत्येक गावात गुटखा विक्रीचे नेटवर्क चालवीत आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देखील त्याने या "जहरील्या गुटख्याची लत" लावून अर्थात "देवाघेवी"चे संबंध चांगलेच प्रस्थापित केले असल्याशिवाय एव्हढे मोठे नेटवर्क चालविणे शक्यच नाही.


   अकोल्यातील हा दिनू भरदिवसा आपल्या दुचाकी वाहनावर दररोज जवळपास एक लाख रुपयांचा गुटखा विक्रीसाठी आणून तो नेहमीच्या पानपट्टी व्यावसायिक व किराणा दुकानदारांना विक्री करून दरमहा ६० ते ७० लाख रुपयांची उलाढाल हा "गुटखा तस्कर" करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

   बजाज नामक हा "गुटखा तस्कर" अकोल्याच्या सिंधी कॅम्प एरियातून चोहोट्टा बाजार परिसरात येऊन दररोज २५ किमी. येऊन लाखो रुपयांचा गुटख्याचा धंदा कितीतरी दिवसांपासून करीत आहे.मात्र दहीहंडा पोलीस स्टेशनला त्याचा रेकॉर्ड मात्र "क्लीन" आहे.ही आश्चर्याची बाब आहे.

     दहीहंडा पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध दारू विक्री, खुलेआम वरली मटक्याचा व्यवसाय आणि जोडीला प्रतिबंधित गुटखा विक्रीचे नेटवर्क अगदी खुलेआम चालत असल्याने या पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे या "डरपोक कागदी वाघांना" पकडायचे सोडून "माशा मारत" बसले की काय अशी शंका येते.अवैध धंद्यांच्या बातम्या प्रकाशित होताच आयपीएस असलेले डीवायएसपी अनमोल मित्तल  "स्पॉटवर" जाऊन "रेड" करतात,परंतु ठाणेदार वाघमारे मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांच्या चुकांवर "पांघरून घालण्याच्या चुका" का करतात हाच एक संशोधनाचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या