अकोल्याचा फरार मंडळ अधिकारी महादेव भगत नागपुरात सापडला...




   अकोला तहसील कार्यालया अंतर्गत महसूल  मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असणारा महादेव उत्तमराव भगत हा गेल्या १९ जानेवारी ला अमरावती व अकोल्याच्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  लावलेल्या सापळ्यातून लाचेची रक्कम घेऊन गर्दीचा फायदा घेत निसटून पसार झाला होता. अधिकाऱ्यांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता मात्र त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी निराश न होता जोमाने त्याचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते.

    मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या भगतचे दिवस भरले आणि काल रात्री तो अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या हाती सापडलाच. नागपूरच्या मध्यवर्ती भागातील बर्डी परिसरातून अकोला एसीबीच्या पथकाने त्याला माणगुटीला पकडून लॉकअपच्या आत टाकलेच.


    काल रात्रीच त्याला सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसमोर हजर करून रीतसर ताब्यात घेऊन रातोरात अकोल्याला आणण्यात आले आहे.स्वतःला अतिशय शहाणा समजणारा महादेव भगत अखेर एकदाचा सापडल्याने एसीबीच्या रडारवर आलेला लाचखोर जास्त दिवस मोकळा राहूच शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.आज या लाचखोर मंडळ अधिकारी महादेव उत्तमराव भगतला कोर्टापुढे उभे करून लाचेच्या रक्कमेच्या रिकव्हरीसाठी किमान दोन दिवसांचा तरी पीसीआर मागण्यात येणार आहे.आता किमान दोन दिवस तरी तो अकोला एसीबीचा पाहुणचार सिटी कोतवालीच्या लॉकअप मध्येच घेईल अशी खात्री आहे.

   अकोला एसीबीचे उपाधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीआय सचिन सावंत,नरेंद्र खैरनार, पोकॉ.संदीप ताले,पळसपगार,प्रदीप गावंडे,सुनील येलोने व चालक रहीम खान यांनी ही अटकेची कारवाई यशस्वी केली आहे.

लेटेस्ट प्रेसनोट---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या