संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे.पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर "जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे". भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील. हे शब्द आहेत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुकला यांचे.
काल राज्यातील जनतेच्या नावाने त्यांनी लिहिलेल्या एका पत्रातील हा मजकूर आहे.त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना उद्देशून लिहिलेले ते पत्रच वाचकांसाठी देत आहोत.



0 टिप्पण्या