महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील ३४ व्या क्रीडा स्पर्धा २०२४ नाशिक येथे सपंन्न नुकत्याच संपन्न झाल्यात. त्यामध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील सहभागी क्रीडापटू यांनी उत्कृष्ट कामगीरी केली. त्या अकोला पोलीस दलाची मान उंचावणार्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस किडा स्पर्धा २०२४ चे आयोजन दिनांक ४-२-२०२४ ते दिनांक १०-२-२०२४ या कालावधीमध्ये नाशीक येथे करण्यात आले होते. अकोला पोलीस दलातील ५४ खेडाळुनी यात सहभाग नोंदविला होता. त्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार,कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे हस्ते आज सत्कार करण्यात आला.
आज सोमवार दि.१२/०२/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया तील विजय हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अंमलदार त्यामध्ये मपोकॉ.-१४१२ रूपाली मानकर, तायक्वांदो ६७ किलो सुवर्ण पदक, पोकॉ.-२१७६ सुयश जडीये, बॉडीबिल्डींग ७५ किलो सुवर्ण पदक, पोकॉ.-१७४४ उमेश भाकरे, बॉडीबिल्डींग ८० किलो सुवर्ण पदक, पोकॉ.-१७४४ उमेश भाकरे, बॉडीबिल्डींग८० किलो सुवर्ण पदक, मपोकॉ.-२५०४ मिताली राउत, व्हॉलीबॉल (महिला) रजत पदक, मपोकॉ.-२५४७ पल्लवी तायडे, व्हॉलीबॉल (महिला) रजत पदक मपोकॉ.-२५३० पुजा भटकर, पॉवरलिफ्टिंग,वेटलिफ्टिंग ५२ किलो कांस्य पदक, पोहेकॉ.-३७५ इमरान खान, बॉक्सिग ७१ किलो कांस्य पदक, मपोहेकॉ.-१९०३ सविता कुकडे,(कर्णधार) मपोहेकॉ.-१९२४ रश्मी इंगळे, मपोहेकॉ.-१९७५ दिपाली अग्रवाल, मपोकॉ.-२२११ निता सनके,मपोकॉ.-१८७९ पुजा मढाइत,(बास्केटबॉल महिला) कांस्य पदक यांचा पोलीस अधीक्षक यांनी भेट वस्तु देवुन सत्कार केला असून त्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगीरी बददल समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस दलातील क्रीडापटू यांना मार्गदर्शन करणारे राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके,प्रशिक्षक रवि ठाकुर, अशपाक चव्हाण तसेच सतिश वानखडे यांना सन्मानीत करण्यात आले.




0 टिप्पण्या