अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( शरद पवार गटातील ) जिल्हा अध्यक्षावर अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली होती.काल दि.६/२/२०२४ ला त्याला अकोट न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अकोट तालुक्यातील रहिवाशी असलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष विपुल उर्फ राम म्हैसने याच्यावर तालुक्यातीलच एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरी व अकोल्यातील मैत्रिणीच्या रूमवर वारंवार तिचे शारीरिक शोषण करून दोनदा गर्भपात केल्याचे सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासूनच कुणकुण लागल्याने हा नेता फरार झाला होता.या फरारीच्या काळातच त्याने आपल्या वकिला मार्फत अकोट न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.त्या अर्जावर सुनावणी होऊन काल त्याला अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आला आहे.
दहीहंडा पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत वा त्याच्या जामीन अर्जाला पाहिजे तसा विरोध करू शकले नाहीत,त्यामुळे त्याला जामीन मिळाला असल्याचे शहरात बोलल्या जात आहे.


0 टिप्पण्या