चिडीमार व टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी अकोल्याचे एसपी बच्चनसिंग यांचा पुढाकार...



  अकोला शहर हे शैक्षणिकदृष्टया अत्यंत महत्वाचे शहर असुन अकोला,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ,वर्धा,जळगांव खान्देश या जिल्हयातुन अनेक विदयार्थी शिक्षण घेणेकरीता दरवर्षी हजारोच्या संख्येने अकोला शहरात दाखल होतात. ते विदयार्थी याठिकाणी खाजगी निवासस्थान किंवा वसतीगृहात राहुन आपले शिक्षण पूर्ण करतात.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. त्या अनुषंगाने आज दि.३.२.२०२४ रोजी ११.०० वाजता विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय,अकोला येथे शहरातील तसेच जिल्हयातील शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांचे सोबत विदयार्थी सुरक्षा या विषयावर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या पुढाकाराने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.सदर चर्चा सत्रामध्ये विदयार्थी सुरक्षा संबंधाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली.


   या चर्चासत्रामध्ये उपस्थित प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी आपला परिचय देत त्यांनी विदर्याथ्यांच्या सुरक्षे संबंधी समस्या मांडल्या त्यानंतर पोलीस अधीक्षक अकोला बच्चनसिंग यांनी सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी विदयार्थी सुरुक्षा ही पोलीसांची प्राथमिकता असुन, याबाबत अकोला पोलीस दलातर्फे विदयार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विवीध उपाययोजना करण्यात आल्याचे सांगीतले. यामध्ये अकोला शहरात दामिनी पथक तसेच पोलिस स्टेशन बिट मार्शल व पेट्रोलींग मोबाईल व्हॅन यांनी शाळा सुटण्याच्या वेळेवर पोलीस स्टेशन हददीतील शाळा कॉलेज या ठीकाणी सर्तक पेट्रोलिंग करून वाहतुक नियोजन करावे तसेच शाळेला भेट दयावी.ठाणेदार यांनी आपल्या पोलीस स्टेशन हददीतील शाळा, कॉलेज यांची यादी तयार करून आठवडयातुन एकदा प्रत्येक शाळेला भेट देण्याचे नियोजन करावे तसेच विदयार्थीवर्गा सोबत संवाद साधुन त्यांच्या शंका कुशंकांचे निवारण करावे,ठाणे प्रभारी तसेच दामिणी पथक हे शाळा,कॉलेज, टयूशन, कोचिंग क्लासेस,निर्जन स्थळी पेट्रोलींग करून टवाळखोर मुलांवर प्रतिबंधक कार्यवाही करतील. चर्चा दरम्यान असे निदर्शनास आले की १८ वर्षा खालील मुले शाळेला दुचाकी वाहणे घेवुन येतात त्यावर प्रतिबंध व्हावा याकरीता वाहतुक शाखा यांनी विशेष मोहीम राबवुन रोज वेगवेगळ्या शाळा परिसरात वाहनांची तपासणी करावी तसे आढळून आल्यास मुलांच्या पालकांशी संवाद साधुन त्यांचे समुपदेशन करावे. मुलांच्या मनातील पोलीसांची भिती दुर करण्याकरीता विदयार्थी संवाद,चर्चासत्र,तसेच शाळा भेटी, SELFIE WITH STUDENT हा उपक्रम राबविणे, पोलीस व शाळा यांचा समन्वय साधण्याकरीता शाळा व्यवस्थापक व पोलीस स्टेशन प्रभारी यांचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करून त्यावर वेळोवेळी जनजागृती पोस्टर,सुचना पत्रक, व्हिडीओ,तसेच,सुरक्षा संबंधाने माहिती पत्रक शेअर करावे शाळा व्यवस्थापक, विदयार्थी यांच्यात समन्वय साधावा,अशाप्रकारे पोलीसांनी उपाययोजना केल्याचे सांगीतले. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याबाबत पोस्टरचे विमोचन करण्यात आले. सदरचे पोस्टर हे नवकांती शिक्षक संघटनेचे उमेश म्हसाये,अकोट यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आले होते.


   सदर चर्चा सत्राकरीता प्रमुख पाहुणे जिल्हा  शिक्षणाधिकारी श्रीमती सुचिता पाटेकर, यांचेसह जिल्हया तील सुमारे ८० शाळा,विद्यालयाचे  मुख्याध्यापक व प्राचार्य तथा शालेय प्रतिनीधी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या