लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने पोलीस दलातील बदल्यांचा विषय संबंधितांच्या चांगलाच "पथ्यावर पडला" असून बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या अधिकाऱ्यांची "चांदीच" झाली आहे.तर जे आपल्या मर्जीतील नाहीत वा काहीही ऐकत नाहीत अशांना अडगळीच्या ठिकाणी पाठविण्याची राजकारण्यांना आयतीच "संधी" चालून आलेली आहे.अशा ह्या "दुहेरी संधी"चा लाभ उठवत पोलीस विभागातीलच नव्हे तर जवळपास सर्वच महत्वाच्या विभागातील बदल्यांचे आदेश काढण्याची स्पर्धा सुरू असून राज्यातील जनतेच्या सोयी सुविधेचा कोणताही विचार न करता "मिळालेल्या संधी"चा संबंधित लोकं पुरेपूर "लाभ उठवत" असल्याचे दिसत आहे.
0 टिप्पण्या