लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग,यांनी दिलेल्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सर्वच पोलीस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक या घटक प्रमुखांकडून बदलीपात्र पोलीस निरीक्षकांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार सर्व संबंधीत घटक प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावातील माहितीची छाननी करुन छाननी अंती बदलीपात्र एकुण १३० पोलीस निरीक्षकांची त्यांच्या घटकातून इतर घटकांत बदली करण्यात आली होती.
त्या नंतर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडून केंद्रीय निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निदेशानुसार बदलीस पात्र असलेल्या पोलीस निरीक्षकांची नव्याने माहिती मागविण्यात आली व त्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्याकरिता संबंधित घटकांकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावाची तपासणी करुन तपासणीअंती बदलीस पात्र पोलीस निरीक्षकांच्या विभाग बदलून बदल्या करण्यात आल्या आहेत.






0 टिप्पण्या