पोलीस अधिकाऱ्याने केली स्वतःच्या पिस्तूलाने गोळी झाडून आत्महत्या...




   नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक नगण,वय ४० वर्षे यांनी आज सकाळी स्वतःच्याच सर्विस रिवाल्वरमधून डोक्यात गोळी झाडुन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोलिस निरीक्षक अशोक नगण यांनी स्वतःवर गोळी झाडल्याने नाशिक पोलिस आयुक्तालयासह पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.


     पोलीस निरीक्षक अशोक नगण यांनी आपल्या डोक्याच्या उजव्या बाजूने झाडलेली गोळी त्यांच्या नाकातून बाहेर आली असून अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्महत्येचे नेमके  कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.


    पोलिस निरीक्षक अशोक नगण हे गेल्या वर्षभरापासून अंबड पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत होते.
आज सकाळी दहा वाजता ते आपल्या ड्युटीवर असताना आपल्या केबिनमध्ये बसलेले असतानाच अचानक बाहेर पिस्तूलातून गोळी चालल्याचा आवाज आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांचे सहकारी त्यांच्या केबिनमध्ये गेले असता हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. या संदर्भात तातडीने नियंत्रण कक्षास कळविण्यात आले असता सर्वच यंत्रणा ताबडतोब कामाला लागल्या.अशोक नगण यांनी स्वतःवर गोळी झाडल्याने  यामागे नेमके काय कारण असावे हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. पोलिस सर्वच कारणाचा विचार करून तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या