अकोला जिल्ह्यातील अकोट उपविभागाचे एसडीपीओ आयपीएस अनमोल मित्तल यांच्या पथकाने आज दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान चोहोट्टा बाजार येथील अकोट अकोला हायवेवर असलेल्या महाराजा धाबा समोरच्या शॉपिंग
कॉम्प्लेक्स मधील दिनेश बजाज याच्या दुकान प्लस गोडवूनवर छापा टाकून महाराष्ट्र राज्यात विक्री व खाण्यासाठी प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गुटखा पकडला असून त्याचा मालक अकोला सिंधी कॅम्पमधील रहिवाशी असलेला गुटखा तस्कर दिनेश बजाज मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
विद्रोही मराठावर गेल्याच आठवड्यात या दिनू बजाज बाबत सविस्तर माहिती देऊन वृत्त प्रकाशित केले होते,त्याची दखल घेत अकोट उपविभागाचे एसडीपीओ आयपीएस अनमोल मित्तल यांनी या गुटखा तस्कर दिनेश बजाजच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याची पूर्ण माहिती गोळा करून आज त्याच्या गुटखा अड्ड्यावर आपल्या पथकाला छापामार कारवाई करण्यास पाठविले,बातमी प्रकाशित झाल्यावर गेल्या काही दिवसांपासून त्याने आपल्या पन्टरांना सांगून मालाचा पानटपरयांवर करण्यात येणारा गुटख्याचा पुरवठा थांबविला होता.मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्याने पुन्हा सक्रिय होत या गोडावूनमध्ये गुटख्याचा माल जमा करणे सुरू केले होते.
त्याने आजही आपल्या दुचाकी वाहनावर एक पोते गुटखा आणून या ठिकाणी ठेवला आणि तो हे गोडावून बंद करीत असतानाच एसडीपीओ यांच्या पथकाने त्याठिकाणी अचानक छापा टाकला असता तो त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.पथकातील कर्मचाऱ्यांनी हा गुटख्याचा माल ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला.याठिकाणी तीन पोत्यात पकडलेल्या गुटख्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून ते आल्यावरच खरी किंमत काय ते निष्पन्न होईल.
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर न आल्याने पथकातील राजू मेजर हे दहीहंडा पोलीस स्टेशनची मोबाईल व्हॅन बोलावून जप्त केलेला गुटख्याचा तीन पोती माल दहीहंडा पोलीस स्टेशनला घेऊन गेले असल्याचे तर ह्याठिकानी कोणताही पंचनांमा करण्यात आला नसल्याची माहिती आहे.गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेला अजून बराच अवधी आहे.
स्वतःला दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चोहोट्टा बाजार परिसरातील चाळीस गावांचा "गुटखा किंग" म्हणवून घेणारा "सळेल सप्लायर" दिन्या बजाजला विद्रोही मराठाने त्याची "औकात" दाखवून दिली असून त्याचे गुटखा तस्करीचे साम्राज्यच नेस्तनाबूत केले आहे.गेल्या काही वर्षांपासून दिन्याचे हे सर्व धंदे चोहोट्टा बाजार पोलीस चौकीतील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते व आहेत परंतु त्यांनी आजपर्यंतही त्याच्यावर एकही "कारवाई का केली नाही" हाच संशोधनाचा विषय आहे.
विद्रोही मराठावर गेल्या १५ दिवसांपूर्वी चौकीच्याच मागे भिंतीला लागून चालत असंलेल्या वरली मटक्याच्या बाबतीत बातमी लागताच आयपीएस अनमोल मित्तल यांनी त्याठिकाणी दोनच तासांत धाड टाकून पाच आरोपींना अटक करून कारवाई केली होती.ही बातमी गावातील एका वार्ताहराने विद्रोहीला पुरविली असल्याचे काही "मिंध्या लोकांनी" खोटेच सांगितल्याने ह्या धंदेवाईक लोकांच्या माणसांनी त्या बिचाऱ्याला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती.असे प्रकार नेहमीच होत असल्याने "खाल्ल्या मिठाला जागणारे" या कलियुगातही आहेत याची खात्री पटते.
चोहोट्टा परिसरात चालत आलेल्या अवैध धंद्यांविषयी बातमी प्रकाशित होताचं त्याची शहानिशा करून अकोटच्या एसडीपीओ यांनी १५ दिवसांत दुसऱ्यांदा धाड टाकून धडक कारवाई केली आहे,मात्र चोहोट्टा बा.पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे प्रकार दिसत नाहीत की माहीत नाहीत हे मात्र समजायला मार्ग नाही.सगळ्या गावाला आणि येथून २५ किमी.अंतरावर असलेल्या इतकेच नव्हे तर अकोला जिल्ह्यात केवळ एक महिनाभर आधीच आलेल्या आयपीएस अनमोल मित्तल यांना हे सर्व धंदे दिसतात तर मग या कर्मचाऱ्यांना व ठाणेदार वाघमारे यांना का दिसत नाहीत ? याचेच चोहोट्टा ग्रामस्थांना आश्चर्य वाटत आहे.








0 टिप्पण्या