आलेगावचा ग्रामसेवक गजानन डीवरे निलंबित...




     अकोला जिल्ह्याच्या पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असंलेल्या आलेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गजानन डीवरे यांना त्यांचेवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांसाठी अकोला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांनी काल तडकाफडकी आदेश काढून निलंबित केले आहे.


   गजानन डब्ल्यु डिवरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत आलेगांव, पंचायत समिती पातुर यांचे विरुध्द गट विकास अधिकारी पंचायत समिती पातूर यांनी केलेले दोषारोप व जोडपत्र १ ते ४ मध्ये ठेवण्यात आलेले आरोप व दोषारोपाचे स्वरुप इत्यादी बाबीचे अवलोकन केले असता गजानन डब्ल्यु डिवरे,ग्रा.से. यांचेकडुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील ३ चा भंग झाल्याचे प्रथम दर्शनीच निदर्शनास येत आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. अकोला यांनी गजानन डिवरे,ग्रामसेवक, ग्रामपंचायत आलेगांव,पंचायत समिती पातुर यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९६४ मधील भाग दोन चे कलम ३ (१) (अ) नुसार आदेशाच्या दिनांकापासुन म्हणजेच कालपासून खालील आरोप ठेवून सेवेतुन निलंबीत केले आहे.

१.) चौकशीस अभिलेखे उपलब्ध न करुन देणे

२.) १ ते ३३ नमुने अद्यावत न करणे.

३.) ग्रामपंचायतचा संपुर्ण प्रभार हस्तांतरणाची कार्यवाही न करणे.

४.) स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे न करणेबाबत

५.) करवसुली न करणे.


   निलंबित ग्रामसेवक गजानन डिवरे, यांचे निलंबन काळात मुख्यालय पंचायत समिती,मूर्तिजापूर राहील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या