५० लाखाच्या लाचखोरीतील पीआय महेंद्र शेलार फरार तर हवालदाराला अटक...



  आज ठाणे एसीबीच्या गळाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागून त्यातील १५ लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेत असतांना मिरा भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक व हवालदार ठाणे एसीबीच्या गळाला लागले असून त्यातील हवालदाराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक फरार झाला आहे.

    तक्रारदार व त्यांचे अशिल यांना गुन्ह्य़ात जामीन मिळवून देणे,अटक न करणे अशा प्रकारची मदत करणे साठी फरार असलेल्या पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार याने तक्रारदार यांचेकडे ५०,००,००० रूपयांची मागणी केली व तडजोडीअंती ३५,००,००० रूपये  स्वीकारण्याची तयारी दाखवून पहिला हप्ता १५,००,००० रूपये अटक करण्यात आलेला आरोपी पो.हवा.६००३ गणेश वणवे,भाईंदर पोलिस ठाणे आरोपी याला स्वीकारण्यास सांगितल्यावर दि.१७/०१/२०२४ रोजी अटकेत असलेला गणेश वणवे याने लाचेची रक्कम पंचांसमक्ष  स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्याचे विरुद्ध व फरार झालेला पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार या दोघांचे विरूद्ध मिरा रोड पोलीस स्टेशन,मिरा भाइंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालय येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फरार आरोपीला पकडण्यासाठी एसीबीचे अधिकारी त्याच्या शोधात आहेत.

    सदरहू कारवाई सुनिल लोखंडे,पोलिस अधीक्षक,एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक सौ.अश्विनी संतोष पाटील, सपोफौं.चव्हाण, पो.हवा.पाटील, पो.हवा.महाडिक, मपोहवा.शिंदे,पोशि.भुजबळ,चालक सपोफौं.बर्गे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या