अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षावर अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
अकोट तालुक्यातील लोहारी या गावातील रहिवाशी असलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष विपुल उर्फ राम प्रफुल्ल म्हैसने याच्यावर तालुक्यातीलच एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरी व अकोल्यातील मैत्रिणीच्या रूमवर वारंवार तिचे शारीरिक शोषण करून दोनदा गर्भपात केल्याचे सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरहू मुलीने तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्याचे देखील पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गेले दोन दिवसांपासून या प्रकरणांत तडजोड घडवून आणून या युवा नेत्याला व त्याच्या परिवाराला सदरहू मुलीसोबत लग्न करण्यासाठी मनधरणी करण्यात येत होती मात्र या युवा नेत्याने व त्याच्या परिवाराने यासाठी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने अखेर रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दहीहंडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात भादवीच्या ३७६,३७६(२)( n) ३७७,५१७ सह विभिन्न कलमे संबंधित युवा नेत्यावर लावण्यात आली आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून कुणकुण लागल्याने हा नेता फरार झाला असून पोलीस त्याचा युद्धस्तरावरून शोध घेत आहेत.हे प्रकरण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडल्याने अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.मात्र हा प्रकार घडल्याने अकोट तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरील पाटील व कुणबी या दोन्ही समाजात आपसांत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सदरहू तक्रारीवर दि.१७/१/२०२४ च्या रात्री १२ वाजून २३ मीनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात "जोर आजमाईश" करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. नेमके काय व कोणत्या स्तरावर हे प्रयत्न करण्यात आलेत हे मात्र गुलदस्त्यात आहे.


0 टिप्पण्या