अकोट शहर पोलीसांची कार्यवाही २ देशी कट्ट्यांसह ०९ जिवंत राउंड जप्त,दोन आरोपी अटकेत. अतिसंवेदनशील अकोट शहर गुन्हेगारांचा अड्डा बनत असल्याच्या चर्चेला आजच्या ह्या घटनेने दिला दुजोरा.अकोट शहरातील पोलिसांचा खुफिया विभाग काय करतोय तरी काय ? अगदी कालपरवाच एस.पी.अकोला बच्चनसिंग यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम अकोट शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन अतिसंवेदनशील शहराची माहिती जाणून घेतली होती,मात्र त्यांची पाठ फिरताच ही घातक शस्त्रे सापडल्याने अकोट शहराची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे.
आज मंगळवार दि.१६.०१.२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे हे डिबी पथकासह पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांचेजवळ देशी कट्टा (अग्निशस्त्र ) आहे. वरून सदर इसमांजवळ जावुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ एक खाली मॅक्झीन मिळुन आल्याने त्यांना विचारपुस करून त्यांनी विहीरीत टाकलेले दोन देशी कट्टे व ०९ जिवंत राउंड विर एकलव्य आपतकालीन पथकाचे मदतीने पंचांसमक्ष विहीरीतुन काढुन यातील आरोपी नामे अजय तुकाराम देठे,वय २७ वर्ष रा.धोबीपुरा अकोट व प्रफुल्ल विनायक चव्हाण,वय २५ वर्ष रा. अडगांव बु.ता.तेल्हारा जि.अकोला यांना मोटर सायकलसह ताब्यात घेतले.
सदरची कार्यवाही अकोट पोलीस निरीक्षक तपन कोल्हे,पोलीस स्टेशन अकोट शहर यांचे मार्गदर्शनाखाली डिबी स्कॉडचे पो.उपनि.राजेश जवरे,नापोकॉ.चंद्रप्रकाश सोळंके,पोकॉ. विशाल हिवरे, पोकॉ.मनिष कुलट, पोकॉ. प्रेमानंद पचांग, पोकॉ.रवि सदांशिव,पोकॉ. सागर मोरे.व चालक पो.उपनि. वासुदेव धर्मे, चालक पोकॉ.संदीप तायडे यांनी पार पाडली.




0 टिप्पण्या