दहीहंडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या चोहोट्टा बाजार पोलीस चौकीच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या भिंतीशी चालत असलेल्या वरली मटक्यावर अकोट उपविभागाचे डीवायएसपी आयपीएस अनमोल मित्तल यांनी सायंकाळी साढे सात वाजताच्या सुमारास धाड टाकून जवळपास पाच ते सहा लोकांना रंगेहाथ अटक केली आहे.
आज दुपारीच विद्रोही मराठावर दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत चालत असलेल्या दारू व वरली मटक्याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.अकोटच्या आयपीएस अनमोल मित्तल यांनी या वृत्ताची दखल घेत स्वतः धाड टाकून सदरहू आरोपींना अटक केली आहे.त्यामुळे प्रकाशित झालेले वृत्त अगदी १००% सत्य असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची खात्री पटली असून कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांची दिशाभूल करून चुकीची माहिती देतात हे सिद्ध झाले आहे.
विद्रोही मराठावर बातमी आल्याने पोलिसांनी कारवाई केली याचा राग मनात धरून चोहोट्टा येथील काही २ नंबरचे धंदे करणाऱ्या गावगुंडांनी एका स्थानिक पत्रकारावर हल्ला केला असून तो पत्रकार चांगलाच दहशतीत आला असल्याची सूत्रांची माहिती आहे.याबाबत अजूनपर्यंत तरी कोणतीही पोलीस तक्रार झाली नसून उद्या परिसरातील सगळे पत्रकार पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचे कळते.



0 टिप्पण्या