कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी अकोला पोलिसांचे मार्गदर्शन शिबीर...


कोचींग क्लासच्या विदयार्थ्यांसोबत "सक्षम आणि सुरक्षा व जनजागृती" याबाबत अकोला पोलीस दलाच्यावतीने आज शनिवार दि.२०/०१/२०२४ ला पोलीस लॉन,अकोला याठिकाणी अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हददीतील कोचींग क्लासचे संचालक, व्यवस्थापक आणि त्या ठिकाणी शिकणारे विदयार्थी यांच्यासाठी अकोल्याचे पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंग यांनी "सक्षम आणि सुरक्षा व जनजागृती" बाबत कोचींग क्लासच्या विदयार्थ्यां सोबत चर्चासत्र शिबिराचे आयोजीत केले होते.


या चर्चासत्रामध्ये सिव्हिल लाईन  पोलीस स्टेशन हददीतील जवळपास सर्वच कोचींग क्लासेसचे संचालक आणि व्यवस्थापक यांचेसह ६०० ते ७०० विदयार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर व अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांनी उपस्थित विदयार्थ्यांना पोक्सो कायदा,सोशल मिडीयाचा गैरवापर, सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देवून विदयार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन केले.त्याचबरोबर डायल ११२ चा वापर करून कोणत्याही प्रकारच्या आकस्मिक मदतीसाठी वापर करण्याचे आव्हान केले.पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांनी उपस्थीत कोचींग क्लासचे संचालक,विद्यार्थी यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत माहिती घेऊन त्यावर समाधानकारक चर्चा केली.


     यावेळी उपस्थीतांनी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन व ईतर पोलीस स्टेशन कडुन सुरू केलेल्या पोलीसांचे उपक्रमाबाबत कौतुक करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून दामिनी पथकाची निर्मिती, आवश्यक ठिकाणी पोलीसांची उपस्थिती,पोलीस चौक्यांचे नुतनिकरण,स्टुडंट अँड पोलीस सेल ( Student And Police Cell) याची स्थापना करून कार्यान्वीत करण्यात येत असल्याबाबत सांगितले. 


   बाहेरगांव व जिल्हयामधुन कोचींग क्लासमध्ये येणा-या विदयार्थ्यांसाठी सुरक्षेचा भाग म्हणुन शहरामध्ये Visible Policing, रूटमार्च,गस्त वाढविणे बाबत सांगुन उपस्थीत कोचींग क्लासचे संचालक यांना त्यांच्या ईमारती बाहेर चांगल्या दर्जाचे सिसिटिव्ही कॅमेरे लावण्याबाबत सुचीत केले. त्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी उपस्थित विदयार्थ्यांशी थेट संवाद साधुन त्यांच्या सुचना व अडचणी ऐकून पोलीस प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनाबाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.


   या चर्चासत्राचा उददेश कोचींग क्लासेसचे विदयार्थ्यांना सक्षम बनवून त्यांची सुरक्षा व जनजागृती करण्यासाठी पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक यांनी विदयार्थ्यांना उपदेशपर मार्गदर्शन केले. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पो.नि.प्रदिप शिरस्कर यांनी आभार प्रदर्शन करून पोलीस हेल्पलाईन नंबरचे कार्ड व माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या