चोहोट्टा येथील चण्याला पाणी देण्याचा वाण धरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतलाय ठेका...?





   अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात देवरी फाट्याच्या पुढे खारपान पट्टा सुरू होतो आणि याच भागांत इकडचे शेतकरी दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे पीक घेतात.गेल्या काही वर्षांपूर्वी निसर्गाच्या भरवशावर असलेली ही हरभऱ्याची शेती आता नाही १००% पण किमान ३५-४०% तरी सिंचनाखाली आली आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन,कपाशी काढून झाल्यावर हरभऱ्याचे पीक घेता येते.आणि त्यांच्या या चण्याच्या पिकावरच दरवर्षीच शेतीचे नफा नुकसानीचे बरेचसे गणित अवलंबून असते.

     मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना निसर्गावरच अवलंबून राहून हरभऱ्याचे पीक घ्यावे लागते आणि त्यातून मनात योजलेला हेतू साध्य होईलच असे नाही.थंडी जर योग्य प्रमाणांत राहिली तरच हरभऱ्याच्या पिकाकडून काही आशा करता येऊ शकते.

    तिकडे निसर्गाची अवकृपा म्हणा वा सिंचन सुविधा ज्यांच्याकडे नाही त्यांच्या मदतीला अकोला जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग धावून जात असल्याने अशा शेतकऱ्यांना आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही.कारण वाणच्या धरणावरून अकोला शहर व अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या मोठमोठ्या पाईपलाईन वरील व्हॉल्व वरून रात्रंदिवस "पाण्याचे धबधबे" सुरू राहत असल्याने अकोट ते अकोला रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतांच्या मालकांना व लगतच्या शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी लागणाऱ्या पाण्याची कितीच कमतरता भासत नाही.इतकेच काय तर काही ठिकाणी ही भूमिगत "पाईपलाईन फोडून" देखील प्रसंगी पाणी उपलब्ध करून दिल्या जाते.




   अकोट अकोला रस्त्यावर चोहोट्टा बाजार नजीक माऊली टायर रीमोल्डींग वर्क्स समोर मोठ्या प्रमाणात व्हॉल्व मधून गेल्या एक महिन्या पासून असे "हजारो गॅलन" पाणी सोडल्या जात आहे,की ज्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण होऊन गोरगरीब शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाला त्याचा अप्रत्यक्षपणे "फायदाच होईल".आजच्या युगात इतकी "माणुसकी" तर भाऊ देखील भावाला दाखवत नाही.आता तुम्हीच सांगा हे पाटबंधारे विभागाचे "शेतकऱ्यांवर उपकार"च आहेत ना..?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या