राज्याच्या पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांना त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश गृह विभागाने आज जारी केले आहेत.
यात प्रामुख्याने म्हणजे अमरावती विभागातील रिक्त असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर आर.एल.पोकळे,अप्पर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकेकाळी अमरावतीला विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून राहिलेले चंद्रकिशोर मीना यांना अप्पर पोलीस आयुक्त,संरक्षण व सुरक्षा,मुंबई या पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक,महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. अमरावती शहरात पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून राहिलेल्या आरती सिंग यांना अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल बृहन्मुंबई या पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.











0 टिप्पण्या