अमरावतीची लाचखोर महिला संपदा गजाआड...



   अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त शिक्षकाला त्याच्या सेवाकाळातील गटविम्याची रक्कम मिळावी म्हणून नोटशीट टाकण्यासाठी २००० रुपयांची लाच मागून ती पंचांसमक्ष स्वीकारणाऱ्या महिला कनिष्ठ सहायक अधिकाऱ्याला अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडून गाडगेनगर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून गजाआड केल्याने अमरावतीच्या शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    श्रीमती संपदा संतोष ढगे, वय ४० वर्षे,पद-कनिष्ठ सहायक अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग, अमरावती,रा.सिध्दिविनायक नगर रहाटगाव जि.अमरावती (वर्ग-३) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोर महिलेचे नाव आहे.ही कारवाई आज बुधवार दि.३१/१/२०२४ चे ११ ते ११-३० वाजताच्या दरम्यान जि.प.प्रा.शिक्षण विभाग कार्यालय परिसरातील तायडे यांचे चहा कॅन्टीन,जवळ करण्यात आली आहे.

  तक्रारदार यांनी दि. ४/०१/२०२४ रोजी तकार दिली होती की, ते सेवानिवृत्त शिक्षक असुन दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा १,९०,८४६/- रूपये एवढा गटविमा जमा असुन ते सेवानिवृत्त होवुन १ वर्ष होवुन सुध्दा अदयापही त्यांना त्यांच्या गटविम्याची रक्कम देण्यात आलेली नाही.त्यांनी यासाठी पाठपुरावा केला असता त्यांच्या गटविमा प्रस्तावाची नोटशीट तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठविणे करिता २,००० रुपये लाचेची मागणी संबंधित महिला कर्मचारी करीत असल्याबाबत त्यांनी अमरावती एसीबीला लेखी तकार दिली होती. 

     सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.३१/०१/२०२४ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान श्रीमती संपदा ढगे यांनी पंचासमक्ष २००० रूपये लाचेची मागणी करून सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष २००० रूपये स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेवुन यांच्या विरूध्द गाडगे नगर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावतीच्या पो.नि.विजया पंधरे, पो.नि.केतन मांजरे, पोलीस अंमलदार वैभव जायले,युवराज राठोड, उपेंद्र थोरात, चालक चंद्रकात जनबंधु यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या