अकोट तालुक्यातील इंग्रजकालीन तहसील कार्यालयाची इमारत अत्यंत "धोकादायक व जर्जर" झालेली असतांनाच गेल्या सातआठ वर्षांआधी योग्य निर्णय घेऊन नवीन इमारत बांधण्यासाठी तत्कालीन उपविभागीय अधीकारी शैलेश हिंगे यांनी स्वतः पुढाकार घेऊन जागा निवडन्यापासून तर नवीन तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचा नकाशा करून शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले होते, हे अकोटच्या महसूल विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी व तालुक्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे.
त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आजरोजी यश आले असून अकोटच्या तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी करोडो रुपये खर्च करून टोलेजंग अशी अत्यंत देखणी व सुरक्षित इमारत गेल्या पाचसहा महिन्यांपासून बांधून तयार आहे. या इमारतीत कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच सोयीसुविधा व फर्निचर तयार असून फक्त कार्यालयाचे रिबीन कापून विधिवत उदघाटन करून जुने इमारतीतील फायलींचे गट्टे व रेकॉर्ड त्याठिकाणी स्थानांतरित करणेच तेव्हढे बाकी आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री यांच्या या कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटनासाठी तारखा मिळत नसल्यामुळे विधिवत उदघाटनाचा कार्यक्रम वारंवार पुढे ढकलल्या जात आहे, हे या तालुक्यातील लोकांचे दुर्दैव आहे.फक्त श्रेय कुणाला मिळावे यासाठी या कार्यालयाच्या उदघाटनासाठी तारीख निश्चित होत नसल्याची खरी माहिती आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जुन्या तहसील कार्यालयात दुरुस्ती व रंगरंगोटीची कामे सुरू असल्याने तालुक्यातील जनतेत नवीन इमारतीविषयी संभ्रम निर्माण होत आहे.जनतेत चुकीचा मेसेज जात आहे की बांधलेली नवीन इमारत ही महसूल विभागासाठी नसून त्याठिकानी वनविभागाचे नवीन कार्यालय स्थानांतरित होत आहे.आज मुळातच ही नवीन इमारत ज्यावर बांधण्यात आली आहे ती जागाच वनविभागाच्या मालकीची आहे.त्यामुळे असा गैरसमज होणे साहजिकच आहे.
एकदाचे या जनतेच्या दुर्दैवाकडे दुर्लक्ष करून चालेल परन्तु जुनी तहसील इमारत आता गेल्या काही दिवसांपासून पडायला लागली असल्याने कर्मचारी वर्ग जीव मुठीत धरून याठिकाणी काम करीत असल्याने असंतोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.मागच्याच महिन्यात संजय गांधी योजनेच्या बाजूला असलेल्या एका खोलीवरील छत कोसळले होते हे अकख्या तालुक्यातील जनतेला चांगलेच माहीत आहे.ही जुनी इमारत जागोजागी "क्रॅक" जात असून ती कधीही जमीनदोस्त होऊ शकते आणि असे काही झाल्यास चार दोन कर्मचाऱ्यांचा जीव ही जर्जर इमारत घेतल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे आहे.
साठ ते पासष्ट कोटी रुपये खर्च करूनही सर्व कारभार अद्यापही जुन्याच इमारतीत सुरू आहे आणि गेल्या आठ दिवसांपासून ह्या जुन्या इंग्रजकालीन इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा अवाजवी खर्च करण्यात येत आहे. नव्या इमारतीत जायला आज रोजीचा विद्यमान लोकसभा व विधानसभेच्या पंचवार्षिक योजनेतील अखेरचा मुहूर्त होता. मात्र तरी देखील आज साजरा करण्यात येत असलेल्या प्रजासत्ताकदिनी सुद्धा ह्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त साधल्या न गेल्याने अकोटच्या जनतेप्रती स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.तर जुन्याच इमारतीवर लाखो रुपये निरर्थक खर्च करण्यात येत असल्याने याठिकानी कार्यरत महसूल विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांची जनतेप्रती असलेली बेफिकीर मानसिकता देखील दिसून येत आहे.
नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीवर "कुत्रे मुतत" असतांना जुन्याच इमारतीची डागडुजी करून तेथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत असल्याने जनतेप्रती कवडीचीही सहानुभूती नसलेल्या अधिकाऱ्यांच्या अशा ह्या वागण्याच्या प्रवृत्तीमुळे सामान्य नागरिकांत "चीड व्यक्त" करण्यात येत आहे.
आज तहसील कार्यालयावर शासकीय ध्वजारोहण होत असून तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील अनेक ज्यांना "खरुजले कुत्रेही हुंगत नाही" असे काही नेते देखील पेटीतील पांढरे कपडे काढून हजेरी लावतील.मात्र यातील एकाही नेत्याला नवीन इमारतीचे उद्घाटन करून त्याठिकाणी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थानांतरित करण्याबाबत कोणतीही आस्था नाही. जनतेच्या पैशातून जुन्या इमारतीच्या नूतनिकरणासाठी लाखो रुपये निरर्थक खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची कुणात हिम्मतही नाही,कारण हे नेते या अधिकाऱ्यांच्या "उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले" आहेत हेच खरे...









0 टिप्पण्या