अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्याला हादरवुन सोडणारया तिवसा येथील सराफा व्यावसायिक संजय मांडळे यांचा त्यांच्या राहत्या घरात खून करून तसेच तब्बल ७५ लाख रुपयांच्या रोकड व सोने, चांदीवर हात साफ करणाऱ्या आरोपीचा दोन दिवसांत तपास करून शोध घेणाऱ्या अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचारी,अधिकाऱ्यांचे अमरावती ग्रामीणचे नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अतिरिक्त पो.अ.विक्रम साळी यांनी प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केले आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस दलात नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक, विशाल आनंद सिंगूरी (आयपीएस) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक,विक्रम साळी यांनी तिवसा पोलीस कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी,अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तातडीने या गुन्ह्याचा शोध लावून आरोपीला अटक केल्याबद्दल मोहन गंगन, पत्रकार व पोलीस मित्र तसेच नरेंद्र बोरकर यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे.





















0 टिप्पण्या