नांदेड एसीबीने अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूतला लाचखोरीत केली अटक...



राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर पासून सर्वत्र दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत असून यात समाजात लाचखोरी थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.आणि एसीबीच्या अधिकाऱ्यांना या जनजागृती अभियानाचे चांगले परिणाम मिळत असून जनता जागृत होऊन लाचखोरांच्या तक्रारी करायला पुढे येऊ लागली आहे.

राज्यातील मराठवाडा विभागात नांदेड मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला काल नांदेड जिल्ह्यातील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्या घराच्या घेण्यात आलेल्या झडतीत एक कोटी रुपयांच्या जवळपास नगदी रोकड सापडल्याची माहिती आहे.

 १) गजेंद्र हिरालाल राजपुत, वय ५४ वर्षे,पद अधीक्षक अभियंता,(वर्ग-१) सार्वजनिक बांधकाम मंडळ,नांदेड
 २) विनोद केशवराव कंधारे,वय ४७ वर्षे,पद वरिष्ठ लिपिक,(वर्ग -३), सार्वजनिक बांधकाम मंडळ,नांदेड अशी नावे व पदे असलेल्या या दोन्ही लाचखोरांच्या नांदेड एसीबीने काल रात्री मुसक्या आवळल्या आहेत.दोघांवरही नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या बड्या धेंडाना अटक करण्यात आल्याने संपूर्ण मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे.

    यातील तक्रारदार यांना केदारगुडा,पिंगळी, डोंगरगाव, हदगाव,गोरलेगाव,गुरफळी रोड ता. हदगाव,जि.नांदेड या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले आहे. सदर कामाच्या निवीदा स्विकृतीचे शिफारसीसाठी यातील तक्रारदार हे आलोसे क्र.१) गजेंद्र राजपुत, अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ,नांदेड यांस भेटले असता,त्याने मंजुर झालेल्या दोन टेंडरचे एकुण १४ कोटी १० लाख रूपयाचे अर्धा टक्के रक्कम असे सरसकट ७ लाख रूपयाची मागणी केली व सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता,नांदेड यांच्याकडे शिफारस करतो असे सांगितले.त्यानंतर तक्रारदार संबंधीत टेबलवरील लिपिक विनोद कंधारे याला भेटले असता,त्यांने त्याचे व त्याचेसोबत असलेला लिपीक जयंत धावडे याच्यासाठी प्रत्येक टेंडरचे २५,००० रूपये असे एकुण ५०,००० रूपयांची मागणी केली. सदरचे पैसे हे लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड येथे तक्रार दिली. 
       
           त्यानंतर दि. ३१/१०/२०२३ रोजी व दि. १/११/२०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपुत,वय ५४ वर्षे,पद अधीक्षक अभियंता,(वर्ग-१) सार्वजनिक बांधकाम मंडळ,नांदेड याची भेट घेतली व सात लाख रूपये जास्त होत आहेत. काही तरी कमी करा अशी विनंती केली असता, अधीक्षक अभियंता राजपुत याने तडजोडीअंती सहा लाख रूपयांची पंचासमक्ष मागणी केली व सहा लाख रूपये संबंधीत लिपीक कंधारे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत लिपीक कंधारे यांच्याकडे गेले व राजपुत साहेबांनी सहा लाख रूपये तुमच्याकडे देण्यास सांगितले व त्यांना दोन टेन्डरचे प्रत्येकी २०,००० असे एकुण ६ लाख ४० हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे याने पंचासमक्ष होकार दर्शविला. 
   
    त्यानंतर काल बुधवार दि.१/११/२०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ,नांदेडचे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून ६ लाख गजेंद्र हिरालाल राजपुत, वय ५४ वर्षे,पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-१) याच्यासाठी व आलोसे विनोद केशवराव कंधारे, वय ४७ वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -३), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे ४० हजार रूपये असे एकुण ६ लाख ४० हजार पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 
     
   दरम्यान लाचखोर अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, याचे कार्यालय व घर झडतीतून एसीबी नांदेडच्या पथकाने पंचासमक्ष एकूण ७२,९१,४९० रुपये जप्त केले आहेत. 
       
   दोन्ही लाचखोरांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे.शिवाजीनगर, नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कोठडीत असुन पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड हे करीत आहेत.
   
      सदरची कारवाई डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांच्या मार्गदर्शनात सापळा कारवाई पथकातील अनिल कटके,पोलीस उप अधीक्षक,गजानन बोडके,पोलीस निरीक्षक, सपोनि.गजेंद्र मांजरमकर, पोह.ज्ञानेश्वर पंचलिंगे,तानाजी मुंढे,गजानन पवार, चापोह.शेख अकबर,पोना.राजेश राठोड, पोकॉ.अरशद खान, ईश्वर जाधव, चापोना. गजानन राउत, प्रकाश मामुलवार,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.पुढील तपास राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड हे करीत आहेत.   
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या