वीज वितरण कंपनीचा "माणूस" वाशीम एसीबीच्या तावडीत...
नोव्हेंबर ०७, २०२३
राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेला दक्षता सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात आज वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील वीज वितरण कंपनीचा तंत्रज्ञ शेतकऱ्यांकडून तार ओढण्याचा मोबदला म्हणून पंचांसमक्ष १००० रुपये लाचेची रक्कम घेत असताना रंगेहाथ वाशीम एसीबीच्या तावडीत सापडला आहे.
कुणाल मोहनसिंग छार, वय ३५ वर्षे,पद टेक्निशियन लाईनमन, रिसोड सब डिव्हिजन, रिठद सहेर,आसेगाव पेन, जिल्हा वाशिम.असे ह्या आरोपीचे नाव असून तक्रारदार यांचे शेतातील डीपीचे तार फिटिंग केल्याचा मोबदला म्हणून पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष १००० रुपये लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष १००० रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेविरुद्ध पोस्टे रिसोड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
" ह्याबाबत आजच वाशीम एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली होती त्यावर आजच पडताळणी करून आजच्या आजच सापळा कारवाईचे आयोजन करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात हे विशेष ."
ही कारवाई वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी सुजित कांबळे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. यांच्या नेतृत्वात सापळा कार्यवाही पथकातील पोहवा. असिफ शेख, योगेश खोटे,राहुल व्यवहारे,रवींद्र घरत,चालक नावेद शेख, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,वाशिम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
0 टिप्पण्या