अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मलकापूर गोंड या आदिवासी गावात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी दि.१३/११/२०२३ ला राजू सुरगाये ह्या आदिवासी व्यक्तीच्या दुकानाला व घराला आग लागून त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले.ही घटना घडली त्यादिवशी महसूल विभागातील एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्याने त्याठिकाणी जाऊन आपले कर्तव्य पूर्ण केले नाही.
मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकोटच्या महसूल विभागातील नायब तहसीलदार आत्राम,मंडळ अधिकारी नेमाडे यांनी मलकापूर,(गोंड ) येथील आपत्ती ग्रस्ताच्या घराची व दुकानाची पाहणी करून पंचनामा केला व त्याला जीवनोपयोगी वस्तूंचे शासकीय मदत म्हणून वाटप केले.मात्र ह्यावेळी या विभागाचे मंडळ अधिकारी निंबोळकर व महिला तलाठी धवणे ह्या उपस्थित नव्हत्या तर अकोटचे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत नेमाडे ह्यांची लगबग व नायब तहसिलदार साहेबांची प्रत्येक कृती ही पाहण्यासारखी होती, महत्वाचे म्हणजे यावेळी ते आपल्या परिवारासह ह्या दुःखद घटनेचा पंचनामा करुन मदत देण्यासाठी आले होते की सातपुड्यातील निसर्ग पर्यटनाच्या उद्देशाने सहलीसाठी हे समजू शकले नाही.नायब तहसीलदार हे २४ तास कार्यकारी दंडाधिकारी अर्थात मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत असतात,त्यांना शासनाने विशिष्ट नसला तरी त्यांचे राहणीमान हे त्या पदाला शोभणारे असावे अशी किमान अपेक्षा असते.मात्र सोबतच्या फोटोतील त्यांचे राहणीमान हे मॅजिस्ट्रेट ह्या पदाला शोभणारे आहे की नाही हे आता वरिष्ठ अधिकारी व वाचकांनीच ठरवावे.
आत्राम हे एखाद्या पर्यटकासारखे वावरत असतांना अनेक गावकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष अनुभवले आहे.तर त्यांचा परिवार देखील ह्या अनोख्या पर्यटनाचा आनंद घेत असतांना गावकरी व उपस्थितांना आढळून आले,त्यांच्या या वर्तणुकीबद्दल मलकापुरातील आदिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.







0 टिप्पण्या