राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या,पदोन्नती...




   राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश आजच जारी करण्यात आले आहेत. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ याची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सिंदूरी यांची नियुक्ती तर शहर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त विक्रम साळी यांना अमरावती ग्रामिणला  अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हनून देण्यात आले आहे.वाशीमचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या जागी अनुज तारे यांना देण्यात आले आहे तर अकोला जिल्ह्यातील अकोटच्या डीवायएसपी रितू खोकर यांना सांगलीला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पाठविण्यात येत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या