आजच्या घडीला राज्यातील महिला कोणत्याच बाबतीत मागे नसून त्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करीत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेत ग्रामीण भागात महिलांना आरक्षण दिले असल्याने ग्रामीण भागात अनेक गावांत महिला सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत.
मात्र राजकारण करीत सत्तेच्या सूत्रधार म्हणून मिरवीत असतांनाच त्यातून मलिदा लाटण्यातही आता महिला मागे नसून त्या पुरुषांचे देखील रेकॉर्ड मोडत असल्याचे दिसून येत आहे.असाच काहीसा प्रकार वाशीम जिल्ह्यातील एका गावांत घडला असून मंजूर झालेल्या घरकुलाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या सरपंच महिलेवर वाशीम एसीबीने कारवाई करून अनोखी "भाऊबीज" साजरी केली आहे.
सौ.गौकर्नाबाई विष्णू राठोड,वय ५० वर्ष,पद सरपंच,ग्राम माहुली,व विष्णू मंगु राठोड,वय ५५ वर्षे, खाजगी इसम दोन्ही रा.माहुली,ता मानोरा,जि. वाशिम हे मंजूर झालेल्या घरकुल व विहिरीच्या फाईलवर सही करण्यासाठी १४,००० रुपये मागत असल्याची तक्रार संबंधित लाभार्थ्यांने वाशीम एसीबीला
दि. ९/११/२०२३ ला दिली होती.या लाच मागणीच्या तक्रारीची पडताळणी
दि. ०९/११/२०२३ केली केली असता त्यात तडजोड करून १३,००० रुपये लाच घेण्याचे मान्य करण्यात आले.
आज दि.१६/११/२०२३ रोजी वाशीम एसीबीने आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम १३,००० रुपये स्विकारत असतांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे दोन घरकुलच्या फाईलवर सही करण्याकरिता ४००० रुपये तसेच तक्रारदार यांचे नातेवाईक यांच्या दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता १०,००० रुपये असे पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी क्र.१ व २ यांनी १४,००० रुपयांची मागणी करून तडजोडी अंती १३,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र.२ यांनी १३,००० रुपये लाच रक्कम स्वीकारली असता दोन्ही आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे.मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाशीम एसीबीचे डीवायएसपी गजानन शेळके,सापळा व तपास अधिकारी बालाजी तिप्पलवाड, पोलीस निरीक्षक,एसीबी वाशिम,
सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक, एएसआय. दुर्गादास जाधव,पोहवा. असिफ शेख,राहुल व्यवहारे,पोना. संदिप इडोळे,समाधान मोघाड, चालक मिलींद चन्नकेशला यांनी ही सापळा कारवाई यशस्वी केली.


0 टिप्पण्या