राज्य पोलीस दलातील जवळपास १०४ पोलीस निरीक्षकांना एकाच वेळी नवरात्र व विजयादशमीच्या शुभेच्छा म्हणून डीवायएसपी, सहा.पोलीस आयुक्त पदावर एकाच वेळी पदोन्नती देण्यात आल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पदोन्नतीच्या यादीत राज्यातील सर्वच परीक्षेत्रात कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना समान संधी देण्यात आली असून एकेकाळी अकोला जिल्ह्यात पीएसआय म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संजय धुमाळ यांना ठाणे जिल्ह्यात तर अमरावती आयुक्तालयात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,तथा अमरावती परिक्षेत्रात अकोला जिल्ह्यात हिवरखेड पोलीस स्टेशनला उत्कृष्ट काम केलेले वर्धा येथे कार्यरत पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांना अमरावती शहर आयुक्तालयात सहा.पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना सातारा जिल्ह्यात डीवायएसपी म्हणून नियुक्ती दिली आहे.







0 टिप्पण्या