विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यातील काही शेतकाऱ्यांचे बँकखाते आधारकार्डशी लिंक नसल्यामुळे, आधार प्रमाणीकरण करून देखील खात्यात पैसे पडले नाही असे निदर्शनास आले आहे. तसेच काही शेतकाऱ्यांचे आधार हे Inactive झालेले आहे, म्हणजे त्यांचे आधार कार्डला दहा वर्षे झाले असून त्यांनी त्या आधारमध्ये कोणतेही अपडेट केलेले नाही. यासाठी "सर्वप्रथम" त्यांनी आपले आधार कार्ड जवळच्या आधार केंद्रातून पुढील प्रमाणे अपडेट करून घ्यावे असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.
1. आधार biometric अपडेट करावे.
2. आधार document अपडेट (आधार KYC) करून घ्यावे.
व त्यानंतर बँकेत जाऊन...
3. आधार लिंक bank seeding NPCI करून घ्यावे.
असे केल्यावर शासन स्तरावर परत पंधरा ते वीस दिवसांत पैसे अपोआप सदर आधार लिंक खात्यात जमा होतील.
- - - - - - - - - - - - - - - - - - - -
अधिक माहिती
1. आधार biometric अपडेट साठी फक्त आधार कार्ड आणि स्वतः व्यक्ती हजर पाहिजे.
2. आधार Document अपडेट (आधार KYC) साठी मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड आणि राशन कार्ड, सोबत आधार कार्ड आणि स्वतः व्यक्ती आवश्यक आहे.
वरील दोन गोष्टी फक्त आणि फक्त आधार केंद्रावरच होतात.
- - - - - - - - - - - - - - - - - - - -
बँकेत केलेल्या के.वाय.सी.सोबत आधार के.वाय.सी.चा कोणताही संबंध नसतो.
- - - - - - - -- - - - - - - - - - - -
त्यामुळे आधार अपडेट आणि आधार डॉक्युमेंट अपडेट (आधार KYC) हे आधार केंद्रावरच करता येते. तर बँकेत जाऊन खात्याला आधार सीडींग एन.पी.सी.आय. लिंक हे बँकेत जाऊनच करावं लागेल...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
यापुढे शेतीच्या नुकसानीची शासकीय मदत/अनुदान आधार कार्ड नंबरवर मिळणार आहे.
यासाठी लाभार्थ्याने बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे. हे करतांना बँक कर्मचाऱ्यांना सांगावे कि "आधार नंबर वर पैसे सोडले तर या खात्याला ते पैसे यायला हवे." किंवा PM किसानचे पैसे या खात्याला यायला हवे,असे सांगावे.असे आधार लिंक केलेलेच बँक खाते नंबर संबंधित कार्यालयात द्यावेत.


0 टिप्पण्या