ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटी रुपये जिंकून करोडपती झालेल्या पिंपरी चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांना अखेर आज निलंबीत करण्यात आले असून खाकी वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडें यांचेवर ठेवण्यात आला आहे.त्यांच्याविरुद्ध सुरू करण्यात येत असलेल्या विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमनाथ झेंडे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अंमल बजावणी करणाऱ्या पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्यात प्रशासन व राजकारणी लोकांविषयी नकारात्मकतेची भावना तयार झाली असून प्रमाणिकपणे नोकरी करीत असतानाच वैयक्तिक छंद जोपासणे अथवा दोन पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी कमावने हा गुन्हा कधीपासून ठरत आहे,अशी विचारणा समाज धुरंदर यांना होत आहे.
पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई होत असेल तर देशातील सर्वोच्च बहुमान "भारत रत्न" हा पुरस्कार घेऊनही पैसे कमविण्यासाठी ऑनलाइन गेम असलेल्या जुगाराची जाहिरात करणाऱ्या सचिन तेंडूलकर याच्यावर गुन्हे दाखल करून भारत रत्न पूरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे. एकाच देशात एकाच गुन्ह्यात दोन व्यक्तींना वेगवेगळा न्याय लावण्याची ही रीत कधीपासून सुरू करण्यात आली आहे असा सवाल सुद्धा विचारल्या जात आहे.


0 टिप्पण्या