अकोल्यातील वाडेगाव पोलीस चौकीचा हवालदार दंदी,एसीबीने बनविला बंदी...





   अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाडेगांव पोलीस चौकीत इंचार्ज पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष शालीग्राम दंदी यास ३००० हजाराची लाच घेत असतांना रंगेहाथ अटक करून बाळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून "बंदी" बनविण्याची कारवाई अमरावती एसीबीच्या पथकाने केली असल्याने अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
   
   

*तक्रारदार - पुरुष, वय- २८ वर्ष, रा. वाडेगाव जि . अकोला

 *आलोसे -  सुभाष शालीकराम दंदी, वय-५६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, पद-पोहवा बं.नं. ११७८, वर्ग ३, पोलीस स्टेशन बाळापूर जिल्हा अकोला अतंर्गत पोलीस चौकी वाडेगांव, रा.गीतानगर, राहतनगर जवळ,दुबे एस.टी.डी. चे मागे,अकोला
*लाच मागणी रक्कम
४००० /-रुपये
 
*तडजोडीअंती  लाच  मागणी रक्कम 
३००० /-रुपये

*स्वीकारली रक्कम
 ३०००/-रुपये 

*पडताळणी -
 दि.२०/१०/२०२३

 *सापळा -
 दि.२०/१०/२०२३

*घटना स्थळ - पोलीस चौकी वाडेगाव,पोलीस स्टेशन  बाळापूर जि.अकोला

*कारण- थोडक्यात हकिकत अशी की, यातील तक्रारदार यांचेवर  पोलीस स्टेशन  बाळापूर  येथे  एन सी.  क्रमांक ७२७/२०२३ कलम ५०४,५०६ भादवी  अन्वये अदखलपात्र  गुन्हा नोंद असुन त्या अनुषंगाने  तकारदार यांचेवर कोणतीही   प्रतिबंधक कारवाई (१०७crpc किवा ११०crpc) करू नये याकरीता  आलोसे सुभाष शालीकराम दंदी, वय-५६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, पद-पोहवा बं.नं. ११७८, वर्ग ३, पोलीस स्टेशन बाळापूर जिल्हा अकोला अतंर्गत पोलीस चौकी वाडेगांव, रा. गीतानगर, राहतनगर जवळ,दुबे एस.टी.डी. चे मागे अकोला यांनी  तक्रारदार यांना ४००० रु ची मागणी केली व तडजोडी अंती ३००० रु लाचेची मागणी करून  तकारदार यांचेकडून  लाचेची रक्कम ३०००/- रु. पंचासमक्ष स्विकारली वरुन आज रोजी वर नमुद आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुध्द पो.स्टे.बाळापुर जि.अकोला येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे..

 
*सापळा व तपास अधिकारी
पो. नि.चित्रा मेसरे ला.प्र.विभाग,अमरावती

*कारवाई पथक -
पो.नि.चित्रा मेसरे ला प्र.वि.अमरावती,  पो.नि.केतन मांजरे,ला.प्र.वि.अमरावती 

मपोशि. चित्रा  वानखडे  
ना.पो. कॉ. निलेश महींगे
ना.पो. कॉ.संजय कोल्हे
पो. कॉ.आशिष जांभोळे,
पो. उपनि. बारबुध्दे 
पो. कॉ.स्वप्नील क्षिरसागर 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या