एसीबीच्या १८ दिवसांत ३० कारवाया,५,८२,८०० रुपयांसह ४१ भ्रष्टाचाऱ्यांना रंगेहाथ अटक...




     राज्यातील लाचखोरांची वाढती संख्या ही पुरोगामी महाराष्टाचा नावलौकीक वाढविणारी बाब नसून त्यांच्यामुळे निश्चितच राज्यातील नागरिकांना मान खाली घालावी लागत असून सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्य म्हणून आजरोजी तरी देशात प्रथम क्रमांकावर आले असून त्याचा राज्याच्या विकासावर फार मोठा परिणाम होत आहे. 

    भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस सतत वाढ होत असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अत्यंत शरमेची व चिंतेची बाब आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अगदी जबाबदारीपूर्वक आपले कर्तव्य बजावत असतांनाच "बेशरम" लाचखोर देखील तेव्हढ्याच सतर्कतेने लाचखोरी करून आपले "गाठोडे" जमा करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.गेल्या १५ दिवसांत एसीबीने केलेल्या करवायांवरून हे अगदी सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे.

    महाराष्ट्र एसीबीच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांनी "चौफेर फटकेबाजी" करीत राज्याच्या विविध जिल्ह्यात १८ दिवसांत केलेल्या ३० कारवायांमध्ये एकूण ४१ भ्रष्टाचारी अधिकारी,कर्मचारी व दलालांना अटक करून जवळपास ५,८२,८०० रुपये या "बेलाज्या" लाचखोरां जवळून जप्त केले आहेत.एसीबीने केलेल्या कारवाया "अभिनंदनीय" असल्या तरी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात लाचखोर जाळ्यात अडकणे व इतकी मोठी रक्कम जप्त होणे ही नक्कीच "चिंतनीय" बाब आहे.


































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या