गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात देखील पोहोचली असून काल दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका युवकाने अंगावर ऑइल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असतांनाच अकोट शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.यावेळी त्या युवकाने जरांगे यांच्या बिघडत असलेल्या स्वास्थ्यासाठी सरकारला दोषी धरून मराठा आरक्षण मिळण्यासाठी घोषणाबाजी केली.


0 टिप्पण्या