भ्रष्टाचारी "मिटकरी" वर चंद्रपूर एसीबीची कारवाई...




    चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात आपसांत झालेल्या खरेदी विक्रीच्या एका व्यवहारात पंधरा हजार रुपयांच्या लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक युनिट चंद्रपूर यांना तक्रार प्राप्त होताच त्यांनी तातडीने पावले उचलून तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीची पंचांसमक्ष शहानिशा करून घेतली असता त्यात सत्यता आढळून आली.त्यानंतर बारीक बारीक गोष्टींची तपासणी करून पुढील कारवाईची रूपरेषा ठरविण्यात आली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील मुलच्या दुय्यम निबंधक कार्यालयात निबंधक या पदावर कार्यरत वैशाली मिटकरी यांनी एका जमीन विक्री प्रकरणांत दस्त नोंदनी करण्याकरिता आधी १५ हजार रुपयांची मागणी केली होती नंतर तक्रार पडताळणीच्या वेळी तडजोड करून ती रक्कम १० हजार रुपये ठरविण्यात आली. गुरुवार दि.१२/१०/२०२३ ला दुपारी सापळा कारवाई दरम्यान तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम कार्यालयातच स्वीकारत असतांना दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी ला पंचासमोर रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

   रात्री उशिरापर्यंत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब नोंदवून मुल पोलीस स्टेशनला मिटकरी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    ही कारवाई चंद्रपूर युनिटच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा. शिवराज नेवारे, पोना.वैभव गाडगे,अमोल सीडाम,मपोंशी.पुष्पां काचोळे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या