दोघांच्या भांडणात तिसऱ्यानेच म्हणजे चौकशी करणाऱ्या पोलीस हवालदाराने स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्याच्या नशिबाचे फासे उलटे पडल्याने तो यात चांगलाच अडकला असून,त्याच्या नशीबी फुकटात "पितृदोष" पदरी पडला असून सुरू असलेल्या "पितृपक्षात" जबरदस्तीने "कावळा" बनून जेलमधील पोलिसांचा पाहुणचार घेणे भाग पडले आहे.
अहमदनगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये दि.१०/७/२०२३ रोजी गोळा केलेला कचरा पेटवून देण्याच्या कारणावरून वाद झाला होता.या झालेल्या वादात त्यातील एका शेजाऱ्याच्या भावाची बायको किरकोळ जखमी झाली होती म्हणून दुसऱ्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल केली होती.ही किरकोळ स्वरूपाची तक्रार त्या ठाण्यातील पोलीस हवालदार नंदलाल मुरलीधर खैरे,बक्कल नं.३०१ याचेकडे चौकशीसाठी आली असता, झालेल्या तक्रारीची चौकशी व पंचनामा करण्यासाठी त्यातील दुसर्या शेजाऱ्याच्या घरी गेला होता.तिथे गेल्यानंतर हवालदार खैरे याने त्या तक्रारीतील गैरअर्जदार यांना सांगितले की यातील तक्रारकर्ता हे गैरअर्जदार व त्यांच्या भावाच्या विरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार देणार असल्याचे सांगितले,परंतु परंतु जर तुम्ही ३०,००० रुपये देत असाल तर किरकोळ तक्रार घेऊन हे प्रकरण मिटवून टाकतो असे म्हटले.
परंतु ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांना ही लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी अहमदनगर एसीबीला हवालदार खैरे यांच्याविरुद्ध लाच मागणीची तक्रार नोंदवीली असता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दि.२६/७/२०२३ रोजी पडताळणी केली त्यात असता एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदार नंदलाल खैरे याने पंचांसमक्ष तीस हजार रुपयांची मागणी करून १० हजार रुपयांत "मांडवली" करून ते स्वीकारण्याची तयारी दाखविली.यावरून आज दि.११/१०/२०२३ ला एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार नंदलाल मुरलीधर खैरे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या