तहसील कार्यालय रिसोड येथील पुरवठा विभागातील लिपिक प्रभाकर बोरकर आज रेशन कार्डची दुय्यम प्रत देण्यासाठी लाच मागणी केल्या प्रकरणी वाशिम एसीबीच्या जाळ्यात अडकला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाशिम एसीबीचे उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली असून पोलीस स्टेशन रिसोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे आईच्या नावे असलेल्या राशन कार्डची दुय्यम प्रत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती, परंतु तहसिल कार्यालय रिसोड येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्यावर प्रभाकर बोरकर याला संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्विकारली नाही. प्रभाकर सीताराम बोरकर याने त्याच्याकडे असलेले शासकीय काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने त्याचे विरुद्ध पो.स्टे.रिसोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वाशीम एसीबीचे गजानन शेळके
पोलीस उपअधीक्षक,पोहवा.विनोद मार्कंडे, पोहवा.विनोद अवगळे,पोहवा.योगेश खोटे, पोहवा. आसिफ शेख,नापोशि.रवींद्र घरत, चालक पोहवा.मिलिंद चन्नकेशला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,वाशिम यांनी केली आहे.


0 टिप्पण्या