ग्रामसेवक अमरावती एसीबीच्या गळाला...




   अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समिती अंतर्गत ,ग्रामपंचायत वाठोडा खुर्द येथील ग्रामसेवक केशव मदने,रा.ब्राम्हणवाडा थडी ता.चांदूरबाजार जि.अमरावती (वर्ग-३) हा ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाचे बिल २,००,००० रुपये व सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकामाचे बिल २,७७,००० रुपये एकूण ४,७७,००० रूपये बिल नोटशिट तयार करून मंजुरीसाठी पाठवल्याचे व मागील कामाचे मंजुर झालेल्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्याबाबत हे काम करून देणाऱ्या कंत्राटदाराने लेखी तक्रार दिली  असता,सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.२४/०८/२०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान ग्रामसेवक मदने यांने ग्रामपंचायत वाठोळा खुर्द येथे केलेल्या नविन कामाचे व मागील कामाचे असे एकुण ९२,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ७०,००० रूपये स्विकारण्याची तयारी दाखवुन पहीला हप्ता ५०,००० रूपये लाच रक्कम स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केल्याचे निष्पन्न झाले असता काल दि. ०५/०९/२०२३ रोजी पंचासमक्ष आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी ग्रामसेवक केशव भिमराव मदने वय ३७ वर्ष, ग्रामसेवक, ग्रामपंचायत वाठोळा खुर्द याने तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम ५०,००० रुपये पंचासमक्ष स्विकारत असतांना पंचायत समिती कार्यालय,तिवसा,ता.तिवसा जि.अमरावती याठिकाणी रंगेहाथ पकडून आरोपी ग्रामसेवकास ताब्यात घेण्यात येऊन त्याचे विरुध्द पो.स्टे.तिवसा जि.अमरावती ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरहू कारवाई पो.नि.केतन मांजरे, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती यांचे नेतृत्वात कारवाई पथकातील पो.नि.विजया पंधरे,पोलीस अंमलदार वैभव जायले,नितेश राठोड,युवराज राठोड,आशिष जांभोळे,चालक पो.उप.नि.सतिश किटूकले यांनी यशस्वीपणे पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या