एसीबीच्या एका आठवड्यात १३ कारवाया, २,५८,५०० रुपयांसह २० भ्रष्टाचाऱ्यांना अटक...




     राज्यातील लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस सतत वाढ होत असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अगदी जबाबदारीपूर्वक आपले कर्तव्य बजावत असतांनाच लाचखोर देखील तेव्हढ्याच सतर्कतेने लाचखोरी करून आपले "चांगभले" करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.गेल्या आठवड्यात एसीबीने केलेल्या करवायांवरून हे अगदी स्पष्ट झाले आहे.

    महाराष्ट्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी "चौफेर फटकेबाजी" करीत राज्याच्या विविध जिल्ह्यात एकाच आठवड्यात केलेल्या १३ कारवायांमध्ये एकूण २० भ्रष्टाचारी अधिकारी,कर्मचारी व दलालांना अटक करून जवळपास २,५८,५०० रुपये या लाचखोरां जवळून जप्त केले आहेत.एसीबीने केलेल्या कारवाया "अभिनंदनीय" असल्या तरी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात लाचखोर जाळ्यात अडकणे व इतकी मोठी रक्कम जप्त होणे ही नक्कीच "चिंतनीय" बाब आहे.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या