अकोट तालुक्यातील अंगणवाडी मदतनिस पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.त्याकरिता आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी अकोट येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्या यादीवर संबंधित उमेदवार वा कुणाला काही आक्षेप घ्यावयाचे असल्यास त्याकरिता आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदरहू यादीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्याकरिता तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ती समिती प्रत्येक आक्षेप कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावरच अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल.
या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान कुणाला नोकरी लावून देण्याकरिता पैशांची मागणी केली गेली असल्यास वा कुणाच्या भूलथापांना बळी पडून काही रक्कम दिली असल्यास जिल्हा स्तरावरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून ते आपली तक्रार नोंदवू शकतात.











































0 टिप्पण्या