तहसीलदार उत्तम निलावाड यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द...



   अमरावती महसूल विभागाच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांचे जात वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने रद्द केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.उत्तम निलावाड यांचेसह त्यांच्या नातेसंबंधातील इतर १७ जनांचेही जात वैधता प्रमानपत्र रद्द करण्यात आले आहे.

    औरंगाबाद विभागातील बनावट 'जात वैधता प्रमाणपत्र' धारक तहसीलदार उत्तम बळीराम निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक असलेल्या १७ जणांच्या 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये माधव बालाजी निलावाड , भानुदास बळीराम निलावाड,उत्तम सयाजी निलावाड ,ज्योत्स्ना व्यंकटराव निलावाड,नागेश व्यंकटराव निलावाड, मयुरी माधवराव निलावाड ,सुभाष बालाजी निलावाड ,दत्ता बळीराम निलावाड ,मारोती बळीराम निलावाड ,व्यंकटी बळीराम निलावाड ,स्नेहा व्यंकटराव निलावाड ,सुप्रिया माधवराव निलावाड , स्वप्निल व्यंकटराव निलावाड , शीतल उत्तम निलावाड,पंकज मारोती निलावाड ,नरेंद्र सुभाष निलावाड,नेहा सुभाष निलावाड यांच्या सह आठ जण अजुन  औरंगाबाद समितींच्या निशाण्यावर आहे. अनुसूचित जमाती पडताळणी समितीने एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट "जात वैधता प्रमाणपत्र" रद्द करण्याची ही कदाचित राज्यातील पहिलीच वेळ असावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या