अकोल्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या नावावर खंडणी उकळणारा भामटा पुन्हा सक्रिय...?



  गेल्या काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका "पांढरपेशा दलालाने" पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर सोशल मिडीयावर फेक अकौंट तयार करून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून खंडणीच्या रुपात पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला होता.मात्र लवकरच हा प्रकार लक्षात आल्याने त्याचे बिंग फुटून त्याला पोलीस कोठडीत जावे लागले होते हे जिल्ह्यातील सर्व संबंधित लोकांना चांगलेच माहीत आहे.

   आता हाच प्रकार अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार सायरे यांच्या बाबतीत घडला असून त्यांचे फेसबुक अकौंट हॅक करून त्यांच्या नावावर कुणीतरी असाच एखादा भामटा लोकांना पैसे मागून आपली पैशांची "भूक भागवत" असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे.ठाणेदार सायरे यांनी याबाबत अकोल्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून सायबर पोलीस पुढील टेक्निकल तपास करीत आहेत.अकोला पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी असाच एखादा  आपल्या परिचयातील "भामटा" आपल्या नावावर खंडणी मागून कुणाला "ब्लॅकमेल" तर करीत नाही ना.? याकडे लक्ष देण्याची गरज आहे.यापूर्वीही अकोल्यात बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत असे प्रकार झालेत परंतु त्यांची अवस्था "फुटक्याने xxx मारली,मुक्याला बोलता येईना." अशी असल्याने तक्रार देण्याचे टाळले असल्याचे ऐकण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या