अकोला जिल्ह्यातील अकोला शहराचे तहसीलदार सुनील रामराव पाटील यांचा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे "शरणागती" पत्करल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग आजरोजी तरी गेल्या आठवडाभरापासून कुणालाही न सांगता वा जिल्हाधिकारी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज न देता एसीबीच्या "रेकॉर्डवर फरार" असलेल्या सुनील पाटील यांच्याकडे उरलेला नाही.
तक्रारकर्त्याला तहसीलदार सुनील पाटील यांच्यासाठी आठ हजार रुपये व स्वतःसाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून तक्रारदारावर संशय आल्याने ती न स्वीकारल्याने, परंतु लाच मागणीच्या पडताळणीत पंचासमोर मागणी केल्याने संबंधित लिपिक नासिर खान मुनाफ खान याच्यावर एसीबीने अटक करून गुन्हा दाखल केला होता.त्यावेळी अटक करण्यात आल्यावर नासिर खान यास दुसऱ्याच दिवशी न्यायालयातून जामीन मिळाला, मात्र त्याला जामीन मिळाल्यावर प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलेले आहे.
याचप्रकरणात पडताळणी दरम्यान तहसीलदार सुनील पाटील यांचेही नाव समोर आल्याने अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुनील पाटील यांनाही आरोपी केले असून त्यांच्या कार्यालयाची व घर आणि फार्म हाऊसची देखील झडती घेऊन काही कागदपत्रे मिळतात का याची पाहणी केल्याची महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत चर्चा आहे.
आज अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनील पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्यांच्यापुढे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.परंतु त्याहिठिकानी त्यांना दिलासा मिळेलच याची आजरोजी तरी खात्री देता येत नाही.राज्यात गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी लाच मागणी करून एसीबीच्या कारवायांना सामोरे जाण्याचा जो "धडाका" लावला होता ते सर्व पाहता राज्यातील प्रशासन व न्यायालये देखील भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्याच्या मानसिकतेत असल्याने आता महसूल विभागाच्याच नव्हे तर कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सहजासहजी मोकळे सोडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे अकोल्याचे तहसीलदार सुनील रामराव पाटील हे आणखी किती दिवस फरार राहतात..? वा महसुल प्रशासन आणखी किती दिवस त्यांच्यावर मेहेरबान होऊन शिस्तभंगाची अथवा निलंबनाची कारवाई करीत नाही हेच पाहणे दुर्दैवी अकोलेकरांच्या नशिबी आहे.
अकोलकर दुर्दैवी यासाठी की एसीबीच्या कारवाईत अडकलेले पाटील हे गेल्या दोन वर्षातील दुसरे तहसीलदार आहेत आणि याच ठिकाणाहून नाशिकला बदलून जाताच एसीबीच्या जाळ्यात अडकलेले अकोल्याचे एसडीओ डॉ.निलेश अपार हे देखील त्याच साखळीतील तिसरे उच्चपदस्थ अधिकारी आहेत तर कर्मचाऱ्यांची कुणीच गिणती करून हिशोब ठेवलेला नाही.


0 टिप्पण्या