निव्वळ होबासक्या व लिडरकी करीत सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळण्याचे धंदे करणाऱ्या मंडळ अधिकारयाला तालुक्यातील सर्वच अधिकारी व कर्मचारी,शेतकरी, मोलमजुरी करणारा गरीब वर्ग कंटाळला असतांनाच वरिष्ठ मात्र वारंवार पाठीशी घालत असल्याने हा मंडळ अधिकारी चांगलाच मस्तवाल झाला होता.अखेर त्याच्या पापाची पायली भरल्याने तो उशिरा का होईना एसीबीच्या जाळ्यात अडकलाच.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तहसील कार्यालयाच्या अंतर्गत राळेगावलाच मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेला शिशिर एकनाथ निनावे ह्याच्या विरुद्ध यवतमाळ लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारकर्त्याने तक्रार दिली की त्याने त्याच्या बहिणीला आठ लाख रुपयांत शेत विकले आहे परन्तु त्या शेताच्या विक्रीचा फेरफार महसूल दप्तरी नोंदविण्यासाठी मंडळ अधिकारी शिशिर निनावे हा तीन हजार रुपये लाच मागणी करीत असून फेरफार रुजू करून घेण्यास विनाकारण त्रास देत आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सदरहू तक्रारीची दि.८/८/२९२३ ला पडताळणी केली असता मंडळ अधिकाऱ्याने पंचासमक्ष तीन हजार रुपयांची मागणी करून नंतरच फेरफार नोंदविण्यात येईल असे सांगितल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर लगेच सापळा कारवाई आयोजित करून राळेगाव ते वडकी रस्त्यावर,आकाश जनरल स्टोअर्स समोर बोलावले असता शिशीर निनावे याने पंचांसमक्ष तक्रारकर्त्याकडून लाच रक्कम तीन हजार रुपये स्वीकारले असतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
या लाचखोर मंडळ अधिकाऱ्यावर वणी पोलीस स्टेशनला एसीबीचे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


0 टिप्पण्या