मंत्र्यांच्या आदेशालाही न जुमानता आपली मनमानी करणाऱ्या अकोट पंचायत समितीच्या वडाळी देशमुख येथील ग्रामसेवक एस.जे.उईके यांला अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी ह्यांनी आज आदेश काढून तडकाफडकी निलंबित केले आहे.
वडाळी देशमुख येथील सरपंच प्रवीण पंजाबराव शिंगाडे ह्यांना सरपंच पदावरून अपात्र ठरविण्यात आले असतांना त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.त्या अपिलात दि.१७/७/२०२३ ला शिंगाडे यांच्याकडून निकाल लागून त्यांना कायम ठेवण्यात आले होते.अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दि.२७/७/२०२३ ला ग्राम सचिव उईके यांना शासनाचे तसे आदेश सुद्धा पाठवून नियमानुसार योग्य ते सहकार्य करून कामकाज सुरळीत चालविण्याबाबत सूचित केले होते.मात्र उईके यांनी कायम ठेवण्यात आलेले सरपंच शिंगाडे यांना कोणतेही सहकार्य केले नाही उलट उईके यांनी दि.३१/७/२०२३ ला बोलावलेली ग्राम पंचायतची सभा ठरलेली असतांना व सर्व सदस्यांना सभेची नोटीस पाठविण्यात आलेली असतांना देखील सचिव उईके यांनी स्वतःच्या अधिकारात ही सभा रद्द केली होती.याबाबत सदस्य व सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांना तक्रार देऊन सचिव यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.
असे असतांना गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक उईके यांना करणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागितला होता,परंतु तो न आल्याने त्यांनी जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांना सचिव यांनी शिस्तभंग केल्याबाबत अहवाल पाठवून कारवाई प्रस्तावित केली होती.त्यानुसार जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी ह्यांनी आज ग्रामसेवक एस.जे.उईके यांना निलंबित केले असून निलंबन काळात मुख्यालय तेल्हारा पंचायत समिती ठेवण्यात आले आहे तसे आदेश पुढील कारवाईसाठी अकोट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पाठविण्यात आले आहेत.



0 टिप्पण्या