आज पुन्हा एक महसुलचा मासा वाशीम एसीबीच्या गळाला लागला...




       राज्यातील महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पैसे खाण्याच्या बाबतीत जागतिक रेकॉर्ड बनविण्याची पैज लावली आहे की काय अशी आता शंका येवु लागली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसां पासुन महसूल विभागातील लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाया करून राज्यातील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग थकला आहे परन्तु या विभागातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी जराही थांबायचे नाव घ्यायला अजिबात तयार नाहीत.

    १ ऑगष्टपासून आज वाशीम एसीबीने केलेला तब्बल १० वा ट्रॅप असून दरदिवशी एक याप्रमाणे राज्याच्या प्रत्येक महसूल विभागातुन एसीबीने अगदी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत.

    आज वाशीम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयातील लिपिक अनंत किसन राठोड,  वय ३४ वर्ष,महसूल सहाय्यक,प्रस्तुतकार २, अतिरिक्त प्रभार प्रस्तुतकार १,याला वाशीम एसीबीच्या पथकाने दीड लाख रुपयांची लाच मागणी करून ती स्वीकारत असतांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले आहे.

  साखरडोह,ता.मानोरा,जि.वाशिम येथील ५९ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची दि.१/८/२९२३ व दि.३/८/२९२३ रोजी पडताळणी केली असता यातील तक्रारदार  यांचे शेतीचे मालकीचे सेल सर्टिफिकेट पुतण्याच्या नावाने देण्याकरिता १,५०,००० हजार रुपयाची लाचेची रक्कम पडताळणी दरम्यान मागणी करून स्विकारण्यास तयारी दर्शविली असल्याने आज दि.९/८/२९२३ रोजी  प्रत्यक्ष सापळा कारवाई ही तक्रारदार यांचे घरी आयोजित केली असता अनंत किसन राठोड  याने फिर्यादी यांच्याकडून लाचेचे १,५०,००० रुपये पंचांसमक्ष स्वीकारले त्याच वेळी सापळा रचून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. आलोसे याचे विरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    ह्याच मानोरा तहसील कार्यालयात २ च महिन्यांपूर्वी ह्याच पदावरील अव्वल कारकून मोहन तिडके ह्याला ३०,००० रुपयांची लाच घेतांना वाशीम एसीबीने अटक केली होती.त्याबाबतची कागदोपत्री कारवाई सुरू असतांनाच आज ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे,यामुळे महसूल विभागात भ्रष्टाचाराचा भस्मासुर किती धिंगाणा घालत आहे याचा अंदाज येऊ शकतो.
     
    सदरची कारवाई गजानन शेळके,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.वाशिम यांचे नेतृत्वात  सुजित कांबळे,पोलीस निरीक्षक,पो.हवा. विनोद मार्कंडे,नितीन टवलारकार,दुर्गादास जाधव,राहुल व्यवहारे,पोना.विनोद अवगळे , योगेश खोटे,रवींद्र घरत,चालक नावेद शेख यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या