एसीबीच्या कारवायांमध्ये वाशीमच्या दोन महिलांनी उघडले खाते...




     संपूर्ण महाराष्ट्रात एसीबीच्या जबरदस्त कारवाया सुरू असताना त्या सगळ्याच कारवायांमध्ये पुरुष अधिकारी व कर्मचारी हेच अडकले होते,त्यामुळे भ्रष्टाचारात राज्यातील महिलांचा सहभाग नसतोच अशी राज्यातील नागरिकांची व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची धारणा झाली असतांनाच अमरावती महसूल विभागातील वाशीम जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी आपले म्हणजेच महिलांचे खाते उघडले असून लाचखोरीच्या प्रकरणांत महिलाही कुठेच मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.त्या दोघीही कर्मचारी कर्मचारी आज फक्त ३०० रुपये लाच घेत असताना एसीबीच्या सापळ्यात अडकल्या आहेत.

      वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत  कनिष्ठ लिपिक संगीता माधवराव काकडे व  परिचर संध्या शंकरराव सराटे ह्यांना फिर्यादीचे शेतीच्या चतुःसीमेचा नकाशा काढून देण्यासाठी ३०० रुपयांची लाच घेतांना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

     ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात कारवाई पथकातील पो.हे.कॉ.विनोद मार्कंडे,विनोद अवगळे,पो.शी.योगेश खोटे,रवी घरत,म.पो.ह.योगिता गायकवाड यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या