राज्यभरात एसीबीचा झंझावात सुरूच,मात्र भ्रष्टाचारी निर्ढावले...



    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक खाते चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून त्यांनी राज्यभरात कारवाईचा वेग वाढविला आहे.दरदिवशी दोन ते तीन या सरासरीने भ्रष्टाचारी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर लाच मागणीसाठी यशस्वी कारवाया केल्या असून लाचखोर चांगलेच धास्तावले आहेत,मात्र तरीही राज्यातील लाचखोरीचे प्रमाण काही कमी व्हायचे नावच घेत नाही हेही तितकेच खरे.गेल्या तीन दिवसांत एसीबीने राज्यात जवळपास १० कारवाया केल्या असून लाचखोरांना कोठडीची हवा दाखविली आहे.यात सर्वाधिक लाचखोर हे महसूल विभागाचे असून त्याच खात्यात सामान्य लोकांची अक्षरशः लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.












      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या