अ‍ॅट्रॉसिटी व पोस्को प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता...




   अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जाती वाचक शिवीगाळ व अल्पवयीन मुलीचा विनयभंग तथा पोस्को प्रकरणात एका ६१ वर्षीय वृद्धाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
  
   सदर प्रकरणांत, फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले की,या वृद्धाने एका अल्पवयीन मुलीस आपल्या घरात बोलावून अश्लील वर्तनाचा प्रयत्न केला होता,असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले होते.सदर अल्पवयीन मुलीने आरडाओरड केल्यानंतर या मुलीच्या नातेवाईकांनी सदरहू प्रकरणाची अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. ही घटना २०२१ साल ची आहे. सदरचे प्रकरण  विशेष सत्र खटला क्रं.२/२०२१ नुसार भादंवि ३५४ (ए), ३५४ (बी), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ७,८ व १२, अनुसूचित जाती जमाती कायदा संरक्षण कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) कलम (१) (डब्ल्यू( (आय) (३) (व्ही) (ए) आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. 
     
     सदर प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. याबाबतचा निकाल आकोट जिल्हा सत्र न्यायालयाने २० जुलै २०२३ रोजी जाहीर केला. त्यामध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.यावेळी सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड.जी.एल.इंगोले यांनी मांडली,तर आरोपीची बाजू अ‍ॅड.देवानंद फुसे यांनी मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या