अकोला एलसीबीची जबरदस्त कारवाई,२५ लाखांच्या ४१ मोटारसायकली जप्त,२ आरोपी अटक...



 अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने जबरदस्त कारवाई करीत तब्बल २५ लाख रुपयांच्या जवळपास ४१ मोटारसायकली जप्त करून आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांना अटक केली आहे.


     
   अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे नुकताच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून जळगाव (खा.) व बुलढाणा जिल्ह्यातील दोन म्होरक्यांना ४१ मोटरसायकलिंसह अटक केली असून जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याच गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून आंतरजिल्हा टोळी जाळ्यात येण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या